साताऱ्यामधील महाविद्यालयातील Industry-Academia Interface Meet Review

आज १६ मार्च २०२२, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स सातारा, यांनी Industry Academia Meet चे आयोजन केले. ज्या मध्ये साताऱ्यातील प्रस्थापित उद्योगजगतातील उदयोजक व उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते. साताऱ्यातील फार्मा कंपनी पासून ते शेतीउत्पादन कंपनी चे प्रतिनिधी व उद्योजक उपस्थित होते.

हि Interface Meet घ्यायच्या मागचा उद्देश आणि पुढाकार नक्कीच उत्कृष्ट आहे. या Interface Meet मुळे उद्योग, उद्योजक, शिक्षक, शिक्षण यांच्या मधला संवाद होतो.

मुले, कॉलेज ला शिक्षण घ्यायला जातात, हे शिक्षण त्यांच्या पुढील आयुष्याच्या करिअर च्या दृष्टीने एक मोलाचा वाट बनते. पण आजकालच्या जगात फक्त शिक्षण घेणे उपयोगाचे आहे का? शिक्षण घेऊन नौकरी जरी करायचं म्हणलं तरी ज्या उद्योगात नौकरी करायची आहे त्या उद्योगाला आवश्यक Skill कोणत्या असाव्यात त्या साठी college व त्या क्षेत्रातील उद्योजक एकत्र येणे गरजेचे आहे.

आज नौकरीला जेवढी मागणी आहे त्याहून हे जास्त नौकरी देणाऱ्याची मागणी जास्त आहे. आज भारताला उद्योजक निर्माण करायचे आहेत आणि या निर्मिती साठी प्रस्थापित उद्योजकांचे अनुभव, मार्गदर्शन मुलांपर्यंत पोचवायचे उत्कृष्ट साधन म्हणजे ‘महाविद्यालये’.

अशाच प्रकारचे साधन निर्माण करण्याकरिता YCIS, सातारा येथे Industry-Academia Interface Meet द्वारे प्रयत्न  सुरु आहे.

महाविद्यालये व तेथील प्राध्यापक मुलांपरेंत आणि मुलांमध्ये उद्योजकतेचे बीज रोवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाला अनुभव व मार्गदर्शनाची जोड मिळावी या करीत साताऱ्यातील प्रस्थापित Brands जसेकी, आयुग्राम, वृंदावन ऍग्रो, BVG Mega Food Park, सातारा, हिंदुस्थान फीड्स, रस्टिक आर्टस्, अशा एक ना अनेक उद्योगातील उद्योजकांना व उद्योग प्रतिनिधींना बोलवण्यात आले व महाविद्यालयातील मुलांच्या अभ्यासक्रम व इतर curricula activities मध्ये कोण कोणत्या प्रकारचा विकास करावा यावर चर्चा झाली.

अनेक मुद्दे मांडले गेले. महाविद्यालयाने उद्योग निर्मितीसाठी आवश्यक technical knowledge उत्कृष्ट पद्धतीने अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. पण आज ज्या गोष्टीवर जास्त भर दिला गेला तो म्हणजे मुलांनी प्रॉडक्ट तयार करून त्या प्रॉडक्ट ला brand तयार करण्याच्या वाटचाली साठी लागणारे Practical ज्ञान.

उपस्थित अनेक मान्यवरांनी एका मुद्यावर जास्त भर दिला तो म्हणजे मुलांच्यात Soft skills चा अभाव तसेच उद्योग उभा करण्यासाठी लागणारे market knowledge , corporate knowledge, financial knowledge, accounting, अशा अनेक गोष्टी जे technical ज्ञानाच्या पलीकडे एक नफ्यात नेणाऱ्या उद्योग निर्मितीला लागतो त्याचा अभाव.

अनेक suggestions आल्या आणि या प्रत्येक suggestions वर प्रभावी उत्तर महाविद्यालय त्या suggestions वर कसे काम करत आहे याची खूप चांगली चर्चा झाली. तसेच प्रत्येक येणाऱ्या suggestions वर येत्या काही दिवसात काम करायचे planning देखील महाविद्यालयाने दर्शविले.

आज नक्कीच असे वाटते की शिक्षण, शिक्षक, उद्योग, उद्योजक येणाऱ्या पिढीला प्रगतीच्या वाटेवर नेऊ शकतात

Main Menu